बीड(प्रतिनिधी):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे प्राचार्य उमा जगतकर यांनी ध्वजारोहण करून झेंड्याचा सलामी दिली.
तुलसी इंग्लिश स्कूल बीडच्या वतीने हर घर तिरंगा रॅली चे आयोजन दि.१३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता सदरील रॅलीस सुरुवात झाली. तुलसी इंग्लिश स्कूल ते राजीव गांधी चौक या मार्गावरून रॅली काढण्यात आली.यावेळी ढोल ताशा च्या तालावर लेझीम खेळत विद्यार्थ्यांनी तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांनी 'भारत माता की जय' घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाचा उत्साह पाहण्यास मिळाला.याप्रसंगी सर्व शिक्षक,विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.