शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील चां. ता.बोरा महाविद्यालयास उत्कृष्ट नियतकालिक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दोन पारितोषिके मिळाली आहेत . शिरुर येथील शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन पारितोषिके देऊन सन्मान केला आहे. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियतकालिक स्पर्धेत बोरा महाविद्यालयाच्या सीमांत या वार्षिक अंकाच्या शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये प्रकाशित केलेल्या ' महाराष्ट्र काल आज आणि उद्या' या विशेषांकास पुणे ग्रामीण विभागातील द्वितीय क्रमांकाचे तर शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये 'जपणूक माणूसपणाची' या विशेषांकास पुणे ग्रामीण विभागातील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. नुक तेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. विजय खरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डाॅ. अभिजीत कुलकर्णी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डाॅ. नितीन घोरपडे, डाॅ.डी.बी.पवार, डाॅ. श्रीमती. जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. के.सी.मोहिते व संपादक मंडळातील सदस्यांना ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम व संस्थेच्या इतर पदाधिका-यांनी प्राचार्य डॉ. के.सी.मोहिते या दोन्ही अंकाचे संपादक अनुक्रमे डॉ .अंबादास केत व डॉ राजाभाऊ भैलुमे, दोन्ही नियतकालिकाचे संपादक मंडळ सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक , प्राध्यापकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे. चां. ता.बोरा महाविद्यालयाने दरवर्षी एक विशिष्ट संकल्पना घेऊन त्यावर आधारित वार्षिक विशेषांक प्रकाशित करण्याची परंपरा अविरतपणे जपली आहे. या विशेषांकात महाविद्यालयातील शैक्षणिक, अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रम, विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील प्राविण्य, विद्यार्थ्यांचे लेखन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख घटना व पुरस्कार इ.बाबींचा समावेश असतो.