शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मलठण , ता . शिरुर येथील दुकानाच्या पत्र्या शेडचे कुलुप तोडून उघड्या शेड मध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांने ४६ ,५०० रु किमंतीचे धान्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. तुरी , मका , बाजरी , हुलगा ,हरबरा , राजमा , गहू याची चोरी चोरट्याने केली . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश गुलाब दंडवते वय 32 वर्ष, रा. मलठण, महाले हॉस्पिटल शेजारी, ता. शिरूर जि.पुणे यांनी फिर्याद दिली आहे . दिनांक २ जुलै रोजी सायंकाळी ५ ते 3 जुलै 2024 रोजी सकाळी 07.30 च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मलठण येथील श्रावणी मार्बल अँन्ड स्टाईल या दुकानाचे पत्रा शेडचे गेटचे कुलुप तोडुन उघड्या शेडमध्ये प्रवेश करून तेथून दहा हजार रु किमंतीचे मक्याचे 8 पोते 4,200 रु किमंतीचे तुरीचे 1 पोते , 5,500 रु किमंतीचे राजमा 2 पोते , , 9 हजार रु किमंतीचे बाजरीची पोती . 6,075 रु . किमंतीची हुलगाची ३ पोती सात हजार रु किमंतीची हरबराचीए पोती व 4,400 रु किमंतीची गहु पोती असे एकूण - 46 हजार 175 रु किमंतीचे धान्य चोरुन नेले . या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार उमेश भगत करत आहेत .