शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इनामगाव (ता. शिरूर) येथील शेततळ्यात बुडणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांचे प्राण वाचविणारे उपसरपंच सूरज मचाले यांचा शिरुर येथील आधारछाया फाउंडैशनचा वतीने शिरुर येथे विशेष सन्मान करण्यात आला . इनामगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात पोहण्यासाठी ही पाच मुले गेली होती. परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व काही मुलांना पोहता येत नसल्याने मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी इनामगावचे उपसरपंच सूरज मचाले हे शेततळ्याशेजारीच असलेल्या आपल्या बोअरवेलची मोटर बंद करण्यासाठी आले होते. त्यावेळी मुलांचा आवाज आल्याने मचाले शेततळ्याकडे गेले व मुले बुडत असल्याचे पाहून त्यांनी शेततळ्यात उडी मारून सर्व मुलांना बाहेर काढले व पाचही मुलांचे प्राण वाचविले . मचाले यांच्या धाडसाबद्दल आधारछाया फाऊंडेशनच्या वतीने मचाले यांच्या कुंभार आळीतील विठ्ठल मंदिरात विशेष सन्मान करण्यात आला . यावेळी मचाले यांनी घडलेल्या प्रसंगाचा थरारक अनुभव सांगितला.यावेळी आधारछाया फाउंडैशनच्या सविता बोरुडे, कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , डॉ . वैशाली साखरे ,प्रिती बनसोडे ,ज्योती हांडे,सारिका वीरशैव ,सुजाता रासकर ,मंगल गायकवाड,वैशाली ठुबे शितल शर्मा,स्वप्नाली जामदार,तृप्ती जोशी,आदी उपस्थित होते.