शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ्य नागरीक व माजी मुख्याध्यापक मिश्रीलाल हिरालाल जोशी वय- ९९ वर्ष यांचे वृध्दापकाळाने निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी , १ विवाहित मुलगी , २ मुले , सूना , नातवंडे असा परीवार आहे . जोशी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते . त्याच बरोबर शिरुर शहरात गृहरक्षक दल सुरु करण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला होता . शिरुर नगरपरिषदेच्या लाटेआळीतील मराठी शाळा क्रमांक -१ चे मुख्याध्यापक म्हणून ही त्यांनी काम केले . ते प्रसिध्द असे छायाचित्रकार ही होते . परिसरातील सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक उपक्रमामध्ये त्यांच्या सहभाग असायचा . ॲड . रमेश जोशी व ॲड . बाळकृष्ण जोशी यांचे ते वडिल होत . तर फोटोग्राफर आनंद जोशी व आशिष जोशी यांचे ते आजोबा होत .