परळी ( प्रतिनिधी) परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत प्रेमनाथ कदम यांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिलिंद घाडगे यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.काही दिवसांपूर्वीच परळीतील ज्येष्ठ पत्रकार तथा अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रेमनाथ कदम यांचे निधन झाले होते. प्रेमनाथ कदम हे परळी शहरातील अनेक सामाजिक प्रश्नावर सातत्याने लिखाण करीत होते त्यांचा आर्थिक ताण तणावातून आत्महत्या केल्याने दुःखद मृत्यू झाला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या पत्नीचे सांत्वन केले तसेच त्यांना आर्थिक मदतही दिली.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत वंचितचे तालुका युवा अध्यक्ष राजेश सरोदे, युवा शहराध्यक्ष प्रेम जगतकर, उपाध्यक्ष अवि मुंडे, दुसरे उपाध्यक्ष भीमराव कसबे, महासचिव विनोद रोडे, दिगंबर रोडे तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते