गडचिरोली जिल्हयात 25 'अमृत सरोवर' तयार

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

१५ ऑगस्ट रोजी किनाऱ्यावर होणार ध्वजारोहण

गडचिरोली,()दि.13: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिर्मित या महत्वाच्या प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी 2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्हयात किमान 75 जलाशये, तलाव निर्माण करावयाचे आहेत किंवा त्याचे पुनरज्जीवन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांनाच ‘अमृत सरोवर’ असे म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. गडचिरोली जिल्हयात अमृत सरोवर अंतर्गत जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनात 104 अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. त्यापैकी 15 ऑगस्ट 2022 हया पहिल्या टप्यापैकी 25 अमृत सरोवर पुर्ण झाले आहे. उर्वरित अमृत सरोववर 15 ऑगस्ट 2023 या दुस-या टप्पायात पुर्ण होतील. 

तसेच सदर मोहिम यशस्वीरित्या राबविणे करीता उपजिल्हाधिकारी रोहयो, गडचिरोली यांनी मोहिमेची नियोजनबध्द पध्दतीने आखणी करुन दिलेले उदिष्ट पुर्ण करण्याकरीता कार्यवाही केलेली आहे.

*जिल्हयातील अमृत सरोवर-*

जिल्हयातील निर्मीत अमृत सरोवर 1) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन मधुन झालेली कामे – चांभार्डा, मुडझा बुज, अरततोंडी, देउळगाव , चिखली , गेवर्धा , कोटगुल 2) State Fund मधुन झालेली कामे - खमनचरु , मरपल्ली , इरुकडुम्मे, गेदा,

जांभळी, खुर्सा 3) टाटा ट्रस्ट मधुन झालेली कामे - इंजेवारी, मन्नेराजाराम ,आमगाव महाल, लखामापुर (बोरी) बेलगाव, चिखली, मल्लेरा 4)लोकसहभाग मधुन झालेली कामे – जोगीसाखरा, बहादुरपुर, भोगणबोडी 5) बायफ मधुन झालेली कामे – दुधमाळा, निमनवाडा  

या अमृत सरोवराच्या किना-यावर 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण केले जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निर्मित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंर्तगत गडचिरोली जिल्हयातील 12 ही तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत फळबाग लागवड मोहिमे अंतर्गत 189 हेक्टर मध्ये फळबाग लागवड घेण्यात येणार आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंर्तगत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात ग्रामरोजगार दिवसाचे आयोजन करण्यात आले असुन तेथे नरेगा अंतर्गत विविध योजनाची माहिती व लाभ देण्यात येईल अशी माहिती विजया जाधव उपजिल्हाधिकारी रोहयो, गडचिरोली यांनी दिली.