रायमोहा(प्रतिनिधी)- मराठवाडा शिक्षक संघाची शिरूर तालुका कार्यकारिणी आज निवड करण्यात आली.  तालुका अध्यक्ष पदी शेख इस्माईल तर तालुका सचिव पदी डोळे मिठ्ठू यांची निवड करण्यात आली  

          मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डी.जी. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे विभागिय सरचिटणीस राजकुमार कदम सर जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव काळे जालंदर मा. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक खोले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जालंदर विद्यालय रायमोह येथे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी, सभासदांच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीचे प्रास्तविक जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव काळे यांनी केले त्यांनी नुतन कार्यकारिणीचा प्रस्ताव मांडला. तालुका उपाध्यक्ष पिंपळे दीनानाथ,अण्णासाहेब ढाकणे ,सहसचिव पदी काशिद बी. आर., शिरसाट संदिप कार्याध्यक्ष शिंदे आर. एल., कोषाध्यक्ष भास्कर सानप प्रसिद्धी प्रमुख सुरेश जाधव ,तालुका मार्गदर्शक नाईकवाडे आर.एस. सदस्य पदी मिसाळ एस. टी., गर्जे सि.एस.यांची निवड करण्यात आली यावेळी डोंगरे यु.बी ,सानप जी. आर,बारस्कर आर.जी., मोटे एम.बी.सानप पी.एस., शेळके बी.बी., हराळे जे. टी.,जाधव के.बी., वाघमारे एस.पी. वराट डी. के,महाजन एस. ए,. साठे एस एस., वाणी पी. बी . , घुले एच.पी.,तुतारे एस.एस.,लोखंडे सर ,परमेश्वरे सर,तांदळे यू.एस., दत्ता सांगळे, बुरांगे सर, पठाण एफ.एच. ,मुंढे एम.एम.यांनी उपस्थित पाहुणे व जिल्हा प्रतिनिधींचे स्वागत केले या कार्यक्रमाचे संचालन तावरे डी.एम यांनी केले तर आभार प्रदर्शन नाईकवाडे आर .एस. यांनी केले