शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद साजरा केला . येथील बसस्थानका समोर राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्रजी पवार ) , शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ,व कॉग्रेस आयचे कार्यकर्ते एकत्रित आले व त्यांनी कोल्हे यांना मिळालेल्या मताधिक्या बद्दल आनंद साजरा केला . कार्यकर्त्यांचा हातात शरद पवार , राहूल गांधी , उध्दव ठाकरे व अमोल कोल्हे यांचे फोटो होते . यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी , कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर , अजिमभाई सय्यद ,हाफीज बागवान ,साहिल शेख , नोटरी संजय ढमढेरे , माजी नगरसेवक अशोक पवार , शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खुशाल गाडे , दिपक फलके , रोशन बाफना आदी उपस्थित होते .