शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहरातील बाबूरावनगर येथील गंगासागर सोसायटी फेज -४ चा वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रा तपासणी शिबिरात १५० हून आधिक लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली . आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर शाखा शिरूर घोडनदी अंतर्गत मोफत नेत्रा तपासणी शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना मोफत आय ड्रॉप देण्यात आले . तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना ऑपरेशन करिता अहमदनगर येथे घेऊन जाण्यात येणार आहे . शिबीर यशस्वी करण्यासाठी गंगासागर फेज -४ परिवारचे गणेश देशमुख , संदीप नागवडे , संदिप तिकोणे व सर्व पदाधिकारी व मान्यवर सभासद यांनी प्रयत्न केले