शिरुर दिनांक ( वार्ताहर )सी.टी. बोरा महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे .  एच.एस.सी (बारावी) बोर्ड परीक्षेत सी. टी. बोरा महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा १०० %, वाणिज्य शाखेचा ९४.३० % कला शाखेचा ७५.८२ % तसेच व्यवसाय शिक्षण विभागाचा ८७.५० % निकाल लागला.

     सी. टी. बोरा महाविद्यालयाचे ५६३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी दिली. या महाविद्यालयाच्या नाणेकर अनन्या संपत या विद्यार्थिनीने ८१.००. टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हे कादंबरी रंगनाथ या विद्यार्थिनीने ८५.३३ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. गिरी मनश्री प्रकाश या विद्यार्थिनीने ८०.५० टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. धोका निखिल वर्धमान या विद्यार्थ्यांने ६५.१७ टक्के गुण मिळून व्यवसाय शिक्षण विभागात प्रथम आला. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सी. टी. बोरा महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .