शिरुर : ( वार्ताहर )डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला असून समृद्धी पडोळे, साहिल लंके व अनुष्का औटी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

शाळेचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार, समन्वयक सौ. अक्षता दिवेकर, शिक्षिका सौ. सुनिता सरोदे, सौ. प्रिया नरवडे, सौ. सोनाली लोखंडे, श्री. अमोल वाघमारे यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.