रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्याविरुद्ध शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकून ही कारवाई केली. अशोक हरिश्चंद्र गुळेकर (६२, रा. कासारवेली रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५ लिटर अवैध दारू जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार, तालुक्यातील कासारवेली येथे रियादी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित आरोपीच्या ताब्यात अवैध गावठी दारू पोलिसांना आढळली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अशोक गुळेकरविरूद्ध महाराष्ट्र दारू अधिनियम कलम ई ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.