उमापूर प्रतिनिधी:- पमोल अंतरकर 

संपूर्ण भारत देशामध्ये स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातील शेती संदर्भात आदर्श गाव म्हणून नावलौकिक असलेल्या गायकवाड जळगाव येथे भारत देशाचा अमृत महोत्सव थेट गावच्या भव्यदिव्य हनुमान मंदिराच्या शिखरावरती राष्ट्रध्वज फडकायेऊन साजरा होत आहे 

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे सीमेवरती एक आदर्श गाव म्हणून ज्या गावाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे अशा गायकवाड जळगाव येथील यावर्षीचा संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होणारा भव्य दिव्य भारत देशाचा अमृत महोत्सव प्रत्येक घरावरती तिरंगा ध्वज लावून फडकविण्यात येत आहे आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी गायकवाड जळगाव मधील प्रत्येक घरावरती तिरंगा ध्वज फडकविला तसेच गायकवाड जळगाव येथे श्री हनुमंत राया श्री संत सावता महाराज व महादेव मंदिराचे भव्यदिव्य नवनिर्वाचित मंदिराचे काम चालू असून येथील शिखरावरती गावातील नवतरुण युवकांनी भारत देशाचा यावर्षीचा अमृत महोत्सव थेट शिखरावरती भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला याविषयी येथील सर्व नवत्रण युवकांच्या देशाविषयी असलेले प्रेम व्यक्त होत आहे