शिरुर   :  विद्याधाम प्रशाला शिरुर इयत्ता दहावी वर्ष - १९९३ च्या बॅचचे मैत्र एकत्र जमले ते थेट राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुणे शहरात . ऐतिहासिक अश्या पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथील संभाजी उद्यानात जण एकत्रित जमले . प्रत्येक जण भेटीसाठी आतूर झाले होते . एकमेकांना भेटल्यानंतर जणू विद्याधाम प्रशालेच्या वर्ग तिथे भरला होता .आपले वय ,पद विसरुन सर्व जण शाळेचे विद्यार्थी झाले होते . वर्षभरात काय केले कोण मित्र भेटला , मैत्रीणी भेटल्या याची चर्चा झाली. एकमेकांची खेचाखेची ,शाब्दिक कोट्या , हसा व टाळ्या अश्या वातावरणात गप्पा झाल्या. दीड तास बालगंधर्व रंगमंदिरा समोर गप्पा मारत असताना बाकीचे जग सर्व जण विसरुन गेले होते. याकाळात नक्कीच सर्वाची शुगर व रक्तदाब ही नॉर्मल झालेला होता व फक्त आनंद आणि आनंद सर्वत्र बहरुन होता. या पुणे भेटीसाठी खास आळेफाट्याहून अर्चना यादव , भोसरी हून डॉ. राजश्री सोनवणे (शेलार ) , चंदननगरहून सुनीता नवले , मांजरीहून सुजाता बनकर , ताथवडेहून प्राजक्ता गुरव , खडकवासलाहून शिक्षीका विद्या वाघमारे , शिरुर हून मुख्याध्यापिका स्वाती थोरात , परिचारिका सुरेखा चिकणे , कसबा पेठेतून किशोरी केदारी ,चाकण हून मनिषा लांडे , पुणे मार्केट यार्ड येथून बांधकाम व्यवसायिक रोहित गादिया , खडकीतून व्यवसायिक विवेक कांबळे , शिरुर हून प्रशांत थोरात , प्रा .सतीश धुमाळ , किराणा व्यवसायिक सचिन शेळके , माजी उपसरपंच गणेश खोले आले होते . तब्बल दोन तास गप्पाचा फड चालू होता. या दोन तासाचा वेळेत प्रचंड अशी उर्जा आनंद सर्वाना मिळाला. अनेक मित्र मैत्रीणीची अनुपस्थिती जाणवली त्याना सर्वाना मिस केले. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतरचा पुढील आठवडात पुण्यात भेटायच व जेवण करायच अस प्रॉमिस सर्वानी केल . मित्रांनो आयुष्य फार छोटे आहे त्यातील आनंदाचे क्षण व प्रसंग आपणास औषधा सारखे जीवन सुखदायी करण्यास उपयुक्त ठरतात . कामाच्या धबडग्यात अन कर्तव्याचा चक्रव्यूहात प्रत्येक जण अडकला असला तरी दोस्तीसाठी काही क्षण आपण आवर्जून काढले पाहीजे. दोस्तीचा वृक्षाला वेळ , माया ,प्रेम ,स्नेह यांचे सिंचन केले तर हे झाड बहरते अन सुख दु :खाचा प्रसंगी आपल्यावर शितल छाया धरते ,आधार देते . प्रत्येकाचा आयुष्यात असे मैत्रीची झाड आवश्यक असते .हे झाड बहरण्यासठी वेळ व स्नेह याची आवश्यकता असते हे न दिल्यास मैत्रीचे झाड बहरणार नाही . असो आपल्या प्रत्येकाचा आयुष्यात हे मैत्रीचे झाड बहरुन येईल हा विश्वास आहे . दोन तासाचा गप्पा नंतर हॉटेल गंधर्व मध्ये सर्वानी जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतला .मित्र व मैत्रीणीच्या उपस्थितीने नेहमी पेक्षा जास्त जेवण सर्वांचे झाले . जेवणानंतर सर्वानी गृप फोटो काढला निरोप घेण्याची वेळ आली तरी तेथुन कुणाचा पाय निघत नव्हता . मित्र मैत्रीणीशी आणखी बोलतच रहावे असे वाटत होते . पुन्हा भेटायच अस ठरवून सर्वानी जड अंतकरणाने व मैत्रीचा अनमोल ठेवा अंतकरणात साठवून एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा भेटायच हे ठरवून .