शिरुर दिनांक ( वार्ताहर )पर्यावरण जनजागृती म्हणून शिरुर नगरपरिषद व निवडणूक शाखा शिरुर यांचा वतीने शिरुर नगरपरिषदेच्या सेंटरशाळा येथे ग्रीन बूथ मतदान केंद्र ( पर्यावरण पूरक ) करण्यात आले आहे . या केंद्राचा प्रवेशद्वारावर झावळ्याचा साह्याने आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे . मतदान केंद्रा पर्यत आकर्षक अशी रांगोळ्यांची पायघडी घालण्यात आली आहे . आकर्षक फुलाच्या , पानाच्या कुंड्या ही सर्वांच्या लक्ष वेधून घेत आहेत . मतदारांचे उन्हापासून संरक्षण होण्याकरीता छत उभारण्यात आले असून झावळ्या व पाना फुलांनी हे केंद्र सजविण्यात आले आहे .पर्यावरण पूरक छत व मंडपातील टोपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत .मंडपाच्या प्रवेशद्वारा जवळ सेल्फी पाईंट तयार करण्यात आला आहे .येथे आकर्षक असे सुंदर बटरप्लाय ही तयार करण्यात आले आहे .झाडे पाने फुले याच्या सजावटीतून हे ग्रीन मतदान बूथ केंद्र उभारण्यात आले आहे .मतदानासाठी येणा-या मतदारांकरीता पिण्याचा पाण्यासाठी माठ ही भरुन ठेवण्यात आले आहेत . याखेरीज माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण जनजागृती , वृक्षारोपन , स्वच्छता , आरोग्य , ई वेस्ट जनजागृती यासंदर्भातील फलक ही लावण्यात आले आहे . स्वतंत्र दिव्यांग कक्ष ही तयार करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी सांगितले . ग्रीथ बूथ यसाठी पाणी अभियंता आदित्य बनकर,शहर समन्वयक प्राची वाखारे व सफाई कर्मचारी यांनी महत्वचा सहभाग नोंदवला. शिरुर शहरातील बोरा महाविद्यालयातील मतदानकेंद्रावर सखी बूथ आहे . दरम्यान शिरुर विधानसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार - २लाख २९हजार ४७२ व महिला मतदार - २लाख ९ हजार ७८४ असे एकूण - ४ लाख ३९ हजार २७६ मतदार आहेत . फोटो ओळी शिरुर नगरपरिषदेच्या सेंटरशाळा येथील ग्रीन बूथ