शिरूर दिनांक - खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ .अमोल कोल्हे यांची सर्वात मोठी ताकद त्यांच्या प्रामाणिकपणा आहे असे सांगून तुम्ही सत्त्तेत आहात ना मग दुधाला व कांदाला भाव कधी वाढवून देणार असा सवाल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला . शिरूर लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मांडवगण फराटा येथे सुळे यांची सभा झाली . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी आमदार रोहित पवार ,आमदार अशोक पवार, सुलक्षणा सलगर आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या की मी भाजपाच्या विरोधात बोलते पण एक शब्द ही भाजपा माझ्या विरोधात बोलत नाही. माझ्या विरोधात बोलण्याची जबाबदारी एकाच व्यक्ती कडे दिली आहे. माझ्या विरोधात त्यांना उमेदवार मिळाला नाही .आमच्या घरातील व्यक्ती माझ्या विरोधात उभी केली. माझ्यावर टीका करणारे व विरोधात लढणारे ही घरातीलच आहे . सन २०१४ ते २०२४ ला महागाई कमी झाली का. बेरोजगारी कमी झाली का . असा प्रश्न करुन त्या म्हणाल्या की कोल्हे व सुप्रिया सुळे यांची सर्वात मोठी ताकद त्यांच्या प्रमाणिकपणा आहे. आम्हाला ही आरे ला कारे  म्हणता येत ,पण गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते.आमदार अशोक पवार यांच्या विषयी कोणी अपशब्द काढला तर त्या अपशब्दाला ढाल बनेल असे  ही सुळे म्हणाल्या .