शिरूर दिनांक (वार्ताहर)मी त्याना म्हणालो की साहेब तुम्ही आता आराम करा. मी साठीचा पुढे गेलो मला संधी मिळणार की नाही .मी किती थांबायच .मी तुमच्या मुलगा असतो तर लगेच संधी दिली असती की नाही.मी तुमचा मुलगा नाही म्हणून संधी देत नाही का असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिरुर तालुक्यातील सभे मध्ये बोलताना म्हणाले . शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यात टाकळी हाजी, न्हावरा, केंदूर, शिरूर शहरात अजितदादानी झंझावती प्रचार केला. यावेळी सभामधुन बोलताना ते म्हणाले की शिरूरचे आमदार ॲड .अशोक पवार यांना साहेबांनी सांगितले की तूच पुढच्या वेळी मंत्री. अरे त्याने कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो. अरे अजित पवार याने एकदा मनावर घेतले की मी मी म्हणाराना आमदार होवू दिल नाही. तू आमदारच कसा होतो. असे आव्हान शिरूरचे आमदार अशोक पवार यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल. पवार म्हणाले की घोडगंगा साखर कारखाना सुरु करण्यासाठी चेअरमन आणि संचालक मंडळ यानी प्रयत्न केले पाहिजेत . आमदार अशोक पवार यांच्या वर बोलताना ते म्हणाले की त्यांना निवडून आणण्यासाठी तिकीट देण्यासाठी मी पुढाकार घेतला. कामे करण्यासाठी भाजपा बरोबर जाऊ असे ते म्हणायचे . सह्या करण्यासाठी सर्वात पुढे होते . शपथविधीचा वेळी पहिल्या शपथविधी माझ्या झाल्या त्यानंतर छगनराव भुजबळांच्या झाला तिसरा की चौथा शपथविधी दिलीपराव वळसे पाटील यांच्या झाला . त्याच्या शपथविधी झाल्यावर अशोक पवार म्हणायला लागले की दादांनी यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होत. दादा एकटे जरी जिल्ह्यामधून गेले असते तरी आमची कामे झाली असती. आपल काय आता जमणार नाही. व त्यांनतर ते तिकडे गेल्याचे अजितदादा पवार म्हणाले . व्यंकटेश साखर कारखाना चालला आणी घोडगंगा कारखाना सुरु नाही याचा जाब तुम्ही विचारा असे ते म्हणाले . आमच्या बरोबर नसतानाही राहुल कुल यांचा कारखाना व राजगड साखर कारखान्याला आम्ही मदत केली. मदती संदर्भात आम्ही भेदभाव करीत नाही. असे ही पवार म्हणाले. कांदाची निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. .यंदाचा अर्थसंकल्पात मुस्लीम समाजासाठी असणा-या मौलाना आझाद महामंडळा करीता भाग भांडवल १ हजार कोटी रुपये केले असून कर्जासाठी असणा-या जाचक अटी दूर केल्या आहेत . मी कामाचा माणूस असून विविध विकास कामात आपणास मदत करीत राहील असे ही पवार म्हणाले. आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. आमच्या वडीलधारांचा अपमान करायच काही कारण नाही . ३० वर्ष ते म्हणतील तस ऐकल. आता ते सारखेच वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय घ्यायला लागले. मी त्यांना म्हणायचो साहेब आता शिवसेना चालते आता भाजपा चालते याला धरल त्याला सोडल हे कस . ते म्हणायच की आपल्या डावपेचाचा भाग आहे . मी त्याना म्हणालो की साहेब तुम्ही आता आराम करा. मी साठीचा पुढे गेलो मला संधी मिळणार की नाही मी किती थांबायच .मी तुमच्या मुलगा असतो तर लगेच संधी दिली असती की नाही.मी तुमचा मुलगा नाही म्हणून संधी देत नाही का असे ही पवार म्हणाले .