वडवणी (प्रतिनिधी) कोठारबण नदीवर पुल बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पुलाच्या प्रमुख मागणीसाठी आज कोठरबणच्या नागरिकांसह अबाल-वृद्ध, महिलांनी आक्रमक पावित्रा घेत वडवणी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. सदरील हा मोर्चा बाबूराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
कोठरबन येथे नदी असल्याने या नदीवर पुल बांधण्यात आलेला नाही. नदीच्या पलिकडे दलित वस्ती आहे. या ठिकाणी 1 हजारापेक्षा अधिक लोक राहतात. पावसाळ्यात ये-जा करण्यासाठी येथील नागरिकांची तारांबळ उडते. पुल बांधण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र प्रत्येक वेळी नुसतं आश्वासन दिलं गेलं. निवडणुकीतही पुढार्यांनी अनेक वेळा आश्वासन दिले मात्र त्याची पुर्तता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. पुलाच्या प्रमुख मागणीसाठी आज कोठरबनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये अनेकांची उपस्थिती होती. सदरील हा मोर्चा बाबूराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. या वेळी पं.स.सदस्य श्रीहरी मोरे, नवनाथ धाईजे, साळवे, बाबासाहेब वाघमारे, रमेश मुंडे, बाबासाहेब साळवे, भीमा पायाळ, धनराज मुंडे, श्रीकृष्ण डोंगरे, अमोल पौळ, संजय डोंगरे, सचीन कसबे, राहुल उजगरे, सुनिल डोंगरे, विजय डोंगरे यांच्या