शिरुर दिनांक (वार्ताहर )- मतदान जनजागृती अभियान अंतर्गत बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल शिरुरच्या विद्यार्थ्यानी लोकसभा निवडणूकीकरीता होणा-या मतदानाकरीता पालकांनी मतदान करावे असे आवाहन आपल्या पालकांना पत्राद्वारे केले आहे . यावेळी झालेल्या कार्यक्रमास शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे , बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार , प्राचार्य गणेश मीठपल्लीवार , मुख्याध्यापक विनायक म्हसवडे , रोटरी क्लब शिक्रापूरचे डॉ . मिलिंद भोसूरे , सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संभाजी तळेकर , मनोहर नायडू, प्रबोधन मंचचे राजू चौंधे ,भाउसाहेब बेंद्रे , प्रवीण गायकवाड उपमुख्याध्यापक स्वाती चत्तर व प्रणिती शेळके आदी यावेळी उपस्थित होते . मुख्याधिकारी स्मिता काळे यावेळी बोलताना म्हणाल्या की आपल्या देश लोकशाही असणारा आहे. निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधी निवडतो . यात मतदान महत्वाचे आहे . विद्यार्थ्यानी आपल्या कुटुंबियास मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी केले . सदाशिव पवार यांनी लोकशाहीतील मतदानाचे महत्व विशद करुन सांगितले .गणेश मिटपल्लीवार म्हणाले की लोकशाही मध्ये मतदान महत्वाचे असून बालाजी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याचे पालक आधिकाधिक मतदान करतील यादृष्टीने शाळेतील विद्यार्थ्यानी पालकांना पत्राद्वारे आवाहन केले आहे .यावेळी ,डॉ . मिलिंद भोसूरे , भाउसाहेब बेंद्रे , विनायक म्हसवडे , प्रवीण गायकवाड आदीची भाषणे झाली . सूत्रसंचालन मोनाली मीटपल्लीवार यांनीकेले . आभार उपमुख्याध्यापिका प्रणिता शेळके यांनी मानले .