शिरुर दिनांक ( वार्ताहर ) विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ता यादीत राज्यात १० विद्यार्थी, जिल्ह्यात ३४ विद्यार्थी तर केंद्रात १४२ असे एकूण १८६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळेत शिरूर प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षेत इयत्ता पहिलीचे १०३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते .त्यात बोऱ्हाडे शरण्या हिने १५०पैकी १५० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर जिल्ह्यात ९ व केंद्रात ३६ विद्यार्थी असे एकूण ४६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इयत्ता दुसरीचे १४१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते .त्यातील स्वास्तिक बेलोटे हा राज्यात दुसरा आला . वेदांत सोनवणे राज्यात तिसरा , अभिज्ञा अडसूळ , श्रीयांश पडवळ, वेदांत निंबाळकर यांचा राज्यात चौथा क्रमांक आला , गौरी बांदल , राजलक्ष्मी बोरकर , दिया मोरबाळे यांचा ५ वा क्रमांक आला . या ८ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत , तसेच जिल्ह्यात २३ व केंद्रात ५६ विद्यार्थी असे एकूण ८७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. इयत्ता तिसरीचे एकूण १४० विद्यार्थी परीक्षेत बसले होते .त्यातील जिल्ह्यात १ व केंद्रात २५ असे एकूण २६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. इयत्ता चौथीतील एकूण १२० विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील दांडेकर गौरेश या विद्यार्थ्यांनी ३००पैकी २९६ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच जिल्ह्यात एक व केंद्रात २५ असे एकूण २७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्याधाम प्रशालेचे राज्यात १० विद्यार्थी, जिल्ह्यात ३४ ,केंद्रात १४२ असे एकूण १८६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पना कोकाटे , संगीता बांडे , लता निमसे , जयश्री पाचारणे ,अर्चना वाटेकर , निलिमा पाठक , अर्चना भालेराव , नंदिनी गायकवाड , रुपाली गायकवाड , अनिता पडवळ , अर्चना पिंपरकर , चैताली घोलप , दिपाली मांडगे , भाग्यश्री आसवले ,रोहिणी औटी ,कांचन शिंदे ,सोनाली गोरे ,सौ. कविता मगर, विरक्ती गोऱ्हे , नीलम नऱ्हे , साधना खेडकर ,छाया दिवटे , भारती दाभाडे ,अर्चना घोगरे ,सोनाली घेगडे ,रुपाली करंजकर ,ज्योती अडसूळ साधना कोतकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शिरुर शिक्षण प्रसारक संस्थेच्या पदाधिका-यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे