शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी शिरुर शहरातून रॅली काढुन मतदारांशी संपर्क साधला . बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीस सुरुवात झाली .  रॅलीत आमदार अशोक पवार , शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख पोपट शेलार , शहरप्रमुख संजय देशमुख , कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष ॲड . किरण आंबेकर ,विश्वास ढमढेरे , माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . ही रॅली पुणे नगर रस्ता, मारुती आळी, सरदार पेठ , हलवाई चौक , सुभाष चौक , कुंभार आळी ,आडतबाजार कापड बाजारात या परिसरातून गेली . सरदवाडी ,अण्णापूर , कर्डिलवाडी , शिरुर रामलिंग येथे ही डॉ . कोल्हे यांनी मतदारांशी संपर्क साधला .