रत्नागिरी : 

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काका जोशी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्या वेळी जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनंत सावंत, महासचिव प्रशांत कदम, सुभाष जाधव, तालुका सचिव मुकुंद सावंत, सुमेध जाधव आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ॲड प्रकाश आंबेडकरांनी कोकणच्या परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व करणारे मारुती काका जोशी यांचे दुसऱ्या यादीत नाव जाहीर केले. जोशी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या प्रचारालाही प्रारंभ झाला आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मारुतीकाका जोयशी यांनी त्यावेळचे शिवसेना उमेदवार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्या विरोधात उभे राहून तीस हजारांचा टप्पा पार करून मतदान मिळवले होते. यावर्षी देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काका जोशींना उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. अँड प्रकाश आंबेडकरांनी कोकणातील ओबीसी समाजाला नेत्रुत्व करण्याची पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. मुस्लिम बांधव,ओबीसी बांधव,मराठा बांधव,आदिवासी बांधव,दलित बहुजन बांधवांना देखील त्यांच्या हक्कासाठी एकमेव नेता प्रकाश आंबेडकर लढत आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय या राज्यात विरोधीपक्षनेता आणि विरोधी पक्ष देखील कुणी राहिला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वंचित, बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज कोण उठवत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, मराठा समाजाचा विषय पुढे आला त्यावेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे. ही भूमिका मांडली. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी विधानसभेवर इतिहासात पहिला जाहीर मोर्चा ५ जुलै रोजी बाळासाहेब आंबेडकरांनी काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाज कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधला जाणार नसून तो परिवर्तन चळवळीत सहभागी होऊन माझ्या पाठीशी भक्कपणे उभा राहील असा विश्वास देखील काका जोशींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा निवडणुक ही विनायक राऊत, नारायण राणे, काका जोशी, शकील सावंत, यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता अधिक आहे.