शिरुर दिनांक ( वार्ताहर ) माझ्या आयुष्याची रोलमॉडेल माझी आई रंजना साकोरे असून माझ्या यशात माझ्या आईचा मोठा वाटा आहे . तीच्या मुळेच मी यश प्राप्त करु शकले अशी भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ .मानसी नानाभाऊ साकोरे यांनी व्यक्त केली . शिरुरच्या छत्रपती कॉलनीतील डॉ. .मानसी नानाभाऊ साकोरे या विद्यार्थिनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेत यश मिळविले आहे . तीला देशपातळीवर ५३१ वी रॅक मिळाली आहे . डॉ मानसी साकोरे या पूर्वी आयपीएस झाल्या होत्या .परंतु आयएएस होण्याचे स्वप्नपुर्ती साठी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास कायम ठेवत परीक्षा दिली व त्याना त्यात यश प्राप्त झाले . डॉ. मानसी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी अर्जुंनदादा शेटे यांच्या नात आहेत. डॉ .मानसी व त्याच्या मातोश्री रंजना साकोरे यांच्या शहरातील विविध संघटना यांचा वतीने सन्मान करण्यात आला . लोकशाही क्रांती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी , साहित्य परिषद शाखा शिरुरचे उपाध्यक्ष प्रा . सतीश धुमाळ , बोरा महाविद्यालयाचे भुगोल विभागाचे माजी प्रमुख प्रा .चंद्रकांत धापटे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव , मुख्याध्यापक गंगाधर तोडमल , समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त रामभाउ इंगळे , भीम छावा संघटनेचे चेतन साठे , माजी शिक्षक केंदळे , राउत आदी यावेळी उपस्थित होते यावेळी सत्कारास उत्तर देताना डॉ . मानसी म्हणाल्या की यश हे एकट्याचे नसते . आई वडिल , बहिण भाउ व माझे सर्व कुटुंब या सर्वांचे हे यश आहे . स्पर्धा परीक्षेत यशाचे प्रमाण कमी असते म्हणून मी बीडीएस ही पूर्ण केले . स्पर्धा परीक्षा देताना अपयश आले पण प्रयत्न सोडले नाहीत मी ठरवून आयआरएस ऐवजी आयपीएसला प्राधान्य दिले .जे सोपे आहे ते करण्या ऐवजी ज्याच्यात आव्हान आहे ते करायचे ठरवून आयपीएसचा पर्याय निवडला . माझ्या जीवनात व यशात आई रंजना हीचे मोठे योगदान आहे . तीनेच माझा अभ्यास करुन घेतला व शिस्त लावली माझे रोलमॉडेलच माझी आई आहे . माझ्या मुलाखतीचा वेळेस तुमच्या आयुष्याचे रोल मॉडेल कोण हा प्रश्न विचारला नंतर एका क्षणात माझी आई हीच माझी रोलमॉडेल असल्याचे उत्तर दिल्याचे डॉ. मानसी यांनी सांगितले . समाजाचे आपण देणे लागतो हे वडिलांनी सातत्याने आम्हाला सांगितले. .आयपीएस सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात चांगले काम करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . रंजना साकोरे म्हणाल्या की मानसीला पहिल्यादा परीक्षेत अपयश आले. अपयश आल्यावर तीला सांगितले रडू नको पुन्हा खंबीरपणे उभी राहा असे सांगत तीला साथ दिली . तीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले .तीने कोणत्याही क्लास न लावता घरी अभ्यास करुन हे यश प्राप्त केले . यावेळी प्रास्ताविक प्रा . सतीश धुमाळ यांनी केले . डॉ . सुभाष गवारी , रवींद्र धनक , प्रा. चंद्रकांत धापटे , चेतन साठे , केंदळे यांची ही मनोगते झाली . सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन संजय बारवकर यांनी केले . फोटो ओळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेत डॉ. मानसी साकोरे हीने यश मिळविल्याबद्दल तीचे व तीच्या आई रंजना साकोरे यांचा सत्कार करताना .