शिरुर दिनांक ( वार्ताहर ) 'सियावर प्रभू रामचंद्र कि जय 'व जय श्रीरामच्या जयघोषात शिरुर शहर आणि परिसरात श्रीराम जयंती उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली . शहरातील राम आळीतील समस्त नामदेवमहाराज शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रामनवमीनिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती . यावेळी श्रीराम जन्माचे प्रवचन ह .भ. प . गाडे महाराज यांचे प्रवचन झाले . त्यांनी प्रभू श्रीराम यांच्यातील विविध गुणांची माहिती दिली . जन्मोत्सवाचा वेळी श्रीरामजन्माचा पाळणा म्हणण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित होते . यावेळी श्रीराम नामाचा गजर करण्यात आला .जन्मोत्सवानंतर सुंठवडा व खरबूजाच्या प्रसाद वाटण्यात आला . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर .सिध्देध्वर बगाडे ,विवेक बगाडे , महेश बोत्रे ,गायक हरि मेहंदरकर , मनोज पांढरकामे , साकेत गुजर , ॲड .नाना पाटेकर , कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर , भाजपाचे माजी शहराध्यक्ष ललित नहार, शहर उपाध्यक्ष प्रवीण मुथ्था , ह .भ .प .कानिफनाथ वाखारे , रामभाउ लोखंडे , गायक वैभव मराठे , प्रकाश बाफना , प्राचार्य डॉ .समीर ओंकार , किसनराव लोखंडे , डॉ . नूतन क्षीरसागर , स्वामी समर्थ मंडळ शिरुरचे प्रमोद पवार , आदी उपस्थित होते . जन्मोत्सवा नंतर भाविकांसाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद शिरुर यांचा वतीने महप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . रामलिंग मंदिर शिरुर , शिवसेवा मंदिर , याठिकाणीही श्रीराम नवमीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . फोटो ओळी शिरुर येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी करण्यात आली .