महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली आगारात स्वच्छता अभियान मोहिम
गडचिरोली,()दि.12: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभागातर्फे अमृत महोत्सव निमित्याने दि. 09 ऑगस्ट 2022 ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या मोहिमेअंतर्गत रा.प. गडचिरोली बसस्थानक स्वच्छता मोहिम या विभागातर्फ राबविण्यात आलेले आहे. या मोहिमेत विभागातील व आगारातील परीसर/बसस्थानक व आगार परीसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत विभागातील व आगारातील चालक/ वाहक/ यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने विभागाचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे व आगार व्यवस्थापक मंगेश पांडे तसेच प्रदीप सालोडकर, चरण चहारे, अश्विन दोडके, पवन पाटील, भिकंचन पाटील,लक्ष्मीकांत चौधरी, रवी बुर्ले, किशोर लिंगलवार, पवन बासनवार, अनंता धारणे, नविन बंडवाल, नरेद्रा दुमनवार, कृष्ण निकेसर, प्रकाश मडावी, सचिन धकाते, जमनादास खोब्रागडे, अतुल रामटेके, रवी पुन्न्कटवार, राजु कन्नाके, अभिषेक गणविर, जगदिश गजपुरे, सुरेश सिडाम, मनिषा पंधरे, सोनी फाये, हेमलता मसराम, प्रिया सोळंके, सुप्रिया हनवते, रचना कुमरे, पुष्पा झरे, रेखा धकाते इत्यादींचा सहभाग होता. असे विभाग नियंत्रक रा.प.गडचिरोली यांनी कळविले आहे.