फुलंब्री  ‌‌‌‌:- शैलेंद्र खैरमोडे 

तालुक्यातील पाल येथील ain न्यूज चॅनलचे फुलंब्री तालुका प्रतिनिधी महावीर जैस्वाल यांना AISF वैद्यकीय समितीचा 2022 चा आदर्श पत्रकार महाराष्ट्र राज्य पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल त्यांचावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

महावीर जैस्वाल फुलंब्री तालुक्यातील पाल येथील राहणारे असून त्यांनी 2004 साली आपल्या पत्रकारितेची सुरवात केली,सुरवातीला दैनिक लोकमत या दैनिकाचे जिल्हा परिषद गट प्रतिनिधी म्हणून काम पाहिले,त्यानंतर दैनिक पुण्यनगरी यात ही काम केले,तसेच mcn news चॅनलच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये पदार्पण केले, असून आता ते ain news चॅनलचे काम करत असून त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक,राजकीय,क्षेत्रात काम करून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले असून,पत्राकरीता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असल्यामुळे त्यांना AISF वेद्यकीय समितीचा 2022 चा आदर्श पत्रकार महाराष्ट्र राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून 14 ऑगस्ट रोजी खुलताबाद येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे नियोजन समिती तर्फे कळवण्यात आले आहे.पुरस्कार झाल्या बद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.