शिरुर दिनांक ( वार्ताहर ) - शिरुर शहर परिसरात मोठ्या उत्सहात रमजान ईद साजरी करण्यात आली . गेल्या महिन्याभरा पासून रमजान महिन्याचे उपवास मुस्लिम बांधवाचे सुरु होते . रमजान ईद निमित्त शहरातील मशिदीवर विद्युतरोषणाई करण्यात आली होती . ईद निमित्त सकाळी शिरुर रामलिंग रस्त्यावरील ईदगाह मैदानावर विशेष प्रार्थना ( नमाज ) झाली .यावेळी शिरुर शहर व परिसरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते . नमाज नंतर पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांनी गुलाबपुष्प देवून मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त मागील काही दिवसापासून बाजारपेठेत उलाढाल वाढली होती . फोटो ओळी ईदनिमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना पोलीस बांधव