[ रत्नागिरी ]

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

रत्नागिरीत पहिल्यांदाच एक मोहक प्रेमकथा "ही वाट काटेरी" या दोन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग सावकर नाट्यगृह येथे सादर होणार आहे. "यदा कदाचित रीटन फेम" अभिनेत्री ओशिन साबळे, प्रसिद्ध नाट्य आणि सिने अभिनेत्री रजनी वासनिक, अभिनेता कुणाल भालचंद्र यांच्यासह कोकणातील कलाकारांच्या माध्यमातून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे. या नाटकाची निर्मिती चारिका थिएटर्स आणि सत्यशोधक यांनी केली असून नाटक सादर होण्यापूर्वीच रसिक प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिले आहे.

मराठी नाट्यसृष्टीत आता वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटक सादर होत आहेत. ज्याला प्रेक्षकांचीही पंसती मिळते. मात्र संवेदनशील विषयाला स्पर्श करणाऱ्या नाटकांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. या नाटकांना तुफान प्रतिसाद देखील मिळत असतो. ज्वलंत स्फोटक नात्याचे ताणे-बाणे असलेल्या संवेदनशील विषयाला सामाजिक, कौटुंबिक स्पर्श करणारे "ही वाट काटेरी" या नाटकाचा नाट्यप्रयोग उद्या, 11 एप्रिल 2024 रोजी दुपारी तीन वाजता रत्नागिरी सावरकर नाट्यगृह येथे रंगणार आहे. या नाटकाचे संकल्पना आणि लेखक दीपक पवार, तर प्रसिद्ध दिग्दर्शक मुकेश जाधव यांनी केले आहे.

या नाटकात रत्नागिरीतील दांडे आडोम या गावातील कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे दोन अंकी नाटक कौटुंबिक नाते उलघडणारं आहे. त्यामुळे या नाटकाचा पहिलाच शो हाऊसफुल्ल होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. नव्या नाटकातील तरुण कलाकारही या नाटकासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत.