*तळेगावचा सुपुत्र पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात*

-पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या अधिसभा (सिनेट ) कार्यकारणीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे.यामध्ये खुल्या वर्गाच्या ५ जागांसाठी १८ उमेदवार,इतर मागासवर्गीय प्रवर्ग १ जागेसाठी ४ उमेदवार,अनुसूचित जाती १ जागेसाठी ४ उमेदवार,अनुसूचित जमाती १ जागेसाठी ५ ,भटक्या विमुक्त जाती जमाती १ जागेसाठी ४ व राखीव महिला १ जागेसाठी २ अशा एकूण १० जागेसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असुन यांमध्ये तळेगाव ढमढेरे (ता शिरूर) येथील मयुर तुकाराम भुजबळ हे छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पँँनेलकडुन ओबीसी गटातुन निवडणूक लढवत आहे. पुणे ,अहमदनगर,नाशिक या तीन जिल्ह्यातील पुणे विद्यापीठाचे पदवीधर मतदार संघाचे एकूण ८८ हजार मतदार असून पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २० नोव्हेबर रोजी होणार आहे. तीन जिल्ह्यांतील मतदार असल्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दमछाक होणार आहे.या निवडणुकीसाठी साधारण पँँनेलच्या माध्यमातून तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.प्रामुख्याने प्रथमच या निवडणुकीत राजकीय विरहीत विविध सामाजिक संघटना ,सामजिक संस्था यांचा पाठींबा मिळवत छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पँँनेलने प्रवेश केल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पँँनेल मधून खुल्या जागेसाठी दळवी सुनील खंडेराव व शेख वाहीद कासम,ओबीसी मधून भुजबळ मयुर तुकाराम,एस सी मधून तीकोटे शशिकांत महादेव,एस टी मधून चपटे देवराम चिमाजी ,एन टी मधून खाडे अमोल बाबासाहेब हे उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमवणार आहेत.हा पँँनेल राजकीय विरहीत असल्याने मतदारांची प्रथम क्रमांकांची पसंती या उमेदवारांना राहील अशी चर्चा रंगत असून सध्या या पँँनेलच्या माध्यमातून उमेदवार मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.विशेषतः उमेदवारांना सर्व मतदारापर्यंत पोहचणे शक्य होणार नसल्याने या निवडणुकीत सोशल मिडियाद्वारे प्रभावीपणे प्रचारयंत्रणा राबविली जाण्याची शक्यता आहे.