शिरुर दिनांक ( वार्ताहर ) चिंतामणी लॅब चे विशाल नवनाथ शिंदे वय २१ वर्षे सध्या रा. बाबुराव नगर शिरूर ता शिरूर जि पुणे मुळ रा. विसापुर ,ता. श्रीगोंदा , जि .अहमदनगर यांनी बाबूराव नगर येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश विश्वनाथ शिंदे वय - ३४ वर्षे धंदा - खाजगी नोकरी रा. विसापुर ता श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी याबबत शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे . विशाल नवनाथ शिंदे  हा त्यांचे मित्रांसोबत बाबुरावनगर येथे राहत होता व शिरूर येथे चिंतामणी लॅब चालवत होता.२५ मार्च रोजी विशाल नवनाथ शिंदे याने सिलींगला असलेले लोखंडे हुकाला दोरीचे साहयाने गळफास घेतलेल्याचे आढळून आले . याबाबत आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत .