शिरुर दिनांक (वार्ताहर ) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मंगळवार दिनांक २६ मार्च रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात यांनी दिली आहे . शिवगिरी मंगल कार्यालय मंचर , ता आंबेगाव येथे मंगळवार दिनांक २६ मार्च ला दुपारी साडेतीन वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून याच मेळाव्यात आढळराव राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत . मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , सहकारमंत्री दिलिपराव वळसे पाटील मार्गदर्शन करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले . मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन ही थोरात यांनी केले आहे . आमदार दिलिपराव मोहिते , आमदार  अतुल बेनके, आमदार महेशदादा लांडगे , आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार पोपटराव गावडे यांची उपस्थिती यावेळी असणार असल्याचे ही थोरात यांनी सांगितले .