शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते इम्रान कदिरभाई पठाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांची शिरुर शहर भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . त्याच्या पक्षप्रवेश भाजपाचे शहराध्यक्ष  माजी नगरसेवक नितीन पाचर्णे यांच्या कार्यालयात झाला . व त्याठिकाणी नियुक्तीपत्र ही त्यांना देण्यात आले . यावेळी भाजपा महिला अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेश्मा शेख , अल्पसंख्याक जिल्हा आघाडीचे अध्यक्ष राजूभाई शेख , माजी नगरसेवक नीलेश गाडेकर , माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे , शहर उपाध्यक्ष प्रवीण मुथा , सरचिटणीस विजय नरके , अल्पसंख्याक आघाडीचे माजी शहराध्यक्ष हुसेन शहा , चिटणीस राहील शेख , सागर सातारकर , गणेश पाचर्णे आदी  उपस्थित होते . शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात असल्याचे सांगितले .प्रवीण मुथा यांनी ही यावेळी भाषण केले .पठाण यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन पक्षाचे कार्य सर्वसामान्या पर्यत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले .