रत्नागिरी 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शिमगा उत्सवाच्या परंपरेप्रमाणे वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेली खारवी वाड्यातील खाजगी बोट अचानक दुर्घटनाग्रस्त झाली. बोट अचानक बुडाल्याने बोटीतील बारा मुली पाण्यात पडल्या. मात्र त्यांचा आरडाओरडा ऐकून शिमगा उत्सवाच्या निमित्ताने किनाऱ्यावर असलेल्या लोकांनी ताबडतोब धाव घेतली आणि या बाराही मुलींना वाचविण्यात यश मिळाले. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

मच्छीमार तसेच किनाऱ्यावरील नागरिकांनी वाचविलेल्या बाराही मुलींना त्यानंतर मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तसेच रविवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले मात्र एकाच वेळी बुडालेल्या 12 मुलींना स्थानिकानी पाण्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

प्रतिवर्षी शिमगा उत्सवानिमित्ताने वरवडे खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जलविहार करण्याची वरवडे खारवी वाडा येथील समाजाची परंपरा आहे. रविवारी होळी निमित्ताने वरवडे येथील काही नौका जलविहार करण्यासाठी खाडीत गेल्या होत्या. यातील एक नौका मात्र जलविहार करता करता पाण्यात अचानक बुडाली. या नौकेत प्रमाणापेक्षा अधिक माणसे असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या बोटीत एकाच वेळी बारा मुली होत्या. संबंधित नौका निलेश सुर्वे यांच्या मालकीची आहे.

बोट पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येतात 12 ही मुली पाण्यात पडल्या आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केली. हा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला असलेल्या नौका मालकांनी धाव घेतली. त्यानंतर या पाण्यात बुडालेल्या सर्व बाराही मुलींना वाचविण्यात सर्वांना यश मिळाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइनकर, जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढलेल्या बारा मुलींना मालगुंड आरोग्य केंद्रात दाखल केले. सर्व मुलींची प्रकृती उत्तम असून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र ऐन शिमगा उत्सवात नौका दुर्घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.