शिरुर दिनांक ( वार्ताहर ) -अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते व माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिरुर येथे त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . शिरुर येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी आखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे , सेवानिवृत्त शासकीय आधिकारी रामभाउ शेटे , समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त संजय बारवकर ,बाबूराव पाचंगे ,नोटरी किरण आंबेकर ,सागर नरवडे , रामभाउ इंगळे , रमेश दसगुडे , गणेश खोले , अविनाश जाधव , उमेश शेळके ,योगेश महाजन , उमेश शेळके , महासंघाच्या उर्मिला फलके , अनिल डांगे , त्याच बरोबर अविनाश घोगरे , बाबाजी गलांडे , खुशाल गाडे , पकंज जाधव आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना वर्पे म्हणाले की अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचे संघटन करण्यासाठी अथक प्रयत्न केले .मराठा आरक्षणासह , समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी काम केले .