शिरूर दिनांक ( वार्ताहर) स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पाठीमागे ज्याप्रमाणे खंबीरपणे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे उभे राहिले. त्याचप्रमाणे आगामी काळात ही पाचर्णे कुटुंबियांचा मागे खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही  भाजपाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यानी शिरूर येथे दिली

. शिरूरचे माजी आमदार व  भाजपाचे नेते बाबुराव पाचर्णे यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. पाचर्णे कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी मुंडे आज शिरुर येथे आल्या होत्या. मुंडे यांनी पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांची भेट घेवून सांत्वन केले. मुंडे म्हणाल्या की पाचर्णे यांचे निधन झाले त्यावेळी आपण आजारी असल्यामुळे पाचर्णे कुटुंबियांच्या भेटीला येवू शकले नाही. गोपीनाथ मुंडे यांचे बाबुराव पाचर्णे हे लाडके कार्यकर्ते होते. विधानसभेची उमेदवारी त्यांना देण्याबाबत ही आपण पुढाकार घेतला व प्रचाराला ही आले असल्याचे त्यानी सांगितले. त्याच बरोबर मंत्री म्हणून काम करताना पाचर्णे यांच्या मतदारसंघातील रस्त्यासह विविध विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. पाचर्णे यांचे समाधीस्थळ असणा-या तर्डोबाचीवाडी येथील बाबुराव पाचर्णे यांच्या शक्तिस्थळास आगामी काळात भेट देईल असे त्या म्हणाल्या . स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबियाचा पाठीमागे सदैव खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राहुल पाचर्णे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पकंजा मुंडे यांच्या संदर्भातील आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समवेतील आठवणीना उजाळा देवून पाचर्णे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. पाचर्णे यांचे समाधीस्थळ असलेल्या शक्तीस्थळास पंकजाताई मुंडे यांनी भेट द्यावी असे ही पाचर्णे म्हणाले. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर थोरात ,भाजपाचे एकनाथ शेलार, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, बाबुराव पाचंगे, राहुल पवार,प्रमोद दंडवते,भाजपा महिला आघाडीच्या रेश्मा शेख, माजी सरपंच वर्षा काळे, प्रिया बिरादार, रश्मी क्षीरसागर, वैशाली ठुबे, माजी नगरसेवक विनोद भालेराव,नवनाथ जाधव, अविनाश जाधव, निलेश नवले, संभाजी रणदिवे, भारती राजेद्र शहाणे, दौलतराव खेडकर, आदी यावेळी उपस्थित होते.