परतूर येथील ग्रामीण रुग्णालय मधील अधीपरीचारिका जितेंद्र राऊत यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी परतूर ग्रामीण रुग्णालय मधील अधीपरीचरिका जितेंद्र राऊत हे परतूर ग्रामीण रुग्णालय मध्ये कुठल्याच सुविधा उपलब्ध करून देत नाहीत आणि मनमानी कारभार करतात असे लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष तेजस भिसे यांनी निवेदनात म्हटले आहे परतूर ग्रामीण रुग्णालय येथे जवळपास 16 वर्षापासून कार्यरत आहेत परंतु त्यांची अद्याप कोठेही बदली झालेली नाही त्यामुळे अधिपरीचारिका राजकीय वरद हस्त असल्यामुळे ते त्यांचा मनमानी कारभार करतात रुग्णालयात कधीही वेळेवर येत नाहीत तसेच रुग्णांना अत्यावश्यक सेवा देत नाहीत त्यामुळे परतुर येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब लोकांवर अन्याय होत आहे तसेच परतूर ग्रामीण रुग्णालय येथे कामावर आलेल्या कर्मचारी यांच्या सोबत दूजाभाव ठेवतात करिता तत्काळ कारवाई करून त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करून त्यांना शासन करण्यात यावे असा इशारा निवेदना मार्फत करण्यात आला

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं