शिरुर - ( वार्ताहर ) म्हाडाचे सभापती व माजी खासदार शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतुन मुस्लिम कब्रस्थानातील वजूखाना करीता ३५ लाख व ख्रिश्चन दफनभूमी कडे जाणा-या रस्त्याकरीता ७० लाख रुपयेचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात यांनी दिली . थोरात यांनी सांगितले सर्टीफाईड रोड ने मोरया हॉस्पिटल शेजारुन ख्रिश्चन दफनभूमी कडे जाणा-या रस्त्या सिमेंट कॉक्रीटचा करण्यात येणार असून त्याकरीता ७० लाख रु चा निधी मंजूर करण्यात आला आहे लाटेआळीतील मुस्लिम कब्रस्थानातील वजुखाना करीता ही ३५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यापूवी शिरुर शहराच्या पाणीपुरवठा योजनेकरीता ७१ कोटी रुपये व शिरुर मधील रस्ते , शाळेचे बांधकाम व अन्य विकासकामाकरीता कोट्यावधीचा निधी आढळराव यांनी उपलब्ध करुन दिल्याचे थोरात यांनी सांगितले .