शिरुर - आधुनिक महाराष्ट्राचा जडणघडणीत स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान असून ते महाराष्ट्राचे शिल्पकार असल्याचे मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी म्हणाले . स्व.यशवंतराव चव्हाण सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठाण शिरूर यांच्या वतीने माजी उप पंतप्रधान व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन विविध क्षेत्रातील गुणवंताच्या सन्मान करण्यात आला . यावेळी बॅरिस्टर संग्राम नाथाभाऊ शेवाळे ,सी .ए .प्राची मनोज भटेवरा, डॉ. शिफा रफिक सिकलकर (पी.एचडी., एम. फार्मसी), वास्तूविशारद सोमेश नितीन बारवकर , तौसिफ नसीर सय्यद (मॅनेजर मर्सन इंडिया लि.) अर्णव अतुल बेद्रे (राज्यस्तरीय महाविद्यालयीन संवादिनी वादन स्पर्धा, प्रथम क्रमांक) सौ. कल्पना शिरीषकुमार बरमेचा (बी.ए. उत्तीर्ण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक ) यांचा विशेष सन्मान करण्यात आला . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड .सुभाष पवार , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , माजी नगरसेवक सुकुमार बोरा माजी सभापती ॲड .प्रदीप बारवकर , नीलेश खाबिया ,नोटरी शिरीष लोळगे , माधव सेनेचे रवींद्र सानप ,माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, मुस्लिम जमातचे इक्बालभाई सौदागर , ,मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी ,शिरुर मुद्रण संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे , शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे धरमचंद फुलफगर , प्रा चंद्रकांत धापटे ,मातोश्री कमलबाई बारवकर ,माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब मगर ,मनोज भटेवरा , बिजवंत शिंदे ,माजी नगरसेवक मंगेश खांडरे , ॲड सतीश गवारी , नितीन थोरात , संजय कडेकर , सुनील करळे ,डॉ. अतुलकुमार बेंद्रे , अजिम सय्यद , नीलेश नवले , माजी नगरसेवक आप्पा शेजवळ , योगेश महाजन , बाळासाहेब जामदार ,नाना कदम , बाळू महाराज जोशी , सीमा बारवकर , सुनील चौधरी ,नंदकुमार पिंजरकर ,माजी नगरसेवक विनोद भालेराव , ॲड . सतीश गवारी ,प्रिया रुणवाल , डॉ . वैशाली साखरे ,अनिल बांडे , सागर नरवडे , नीलेश नहार ,नोटरी रवींद्र खांडरे , मनोज ओतारी ,सुधाकर ओतारी , कन्हैय्या दुगड ,संतोष शेजवळ प्रितेश फुलडलिया , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर , बाळासाहेब झोडगे आदी उपस्थित होते . गवारी म्हणाले की शिक्षण ,शेती औद्योगीकरण या क्षेत्रात भरीव असे काम चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे ते शिल्पकार होते . विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत त्यांनी लागू केली ज्याच्या लाभ अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्याना झाला . उजनी धरण व कोयना धरण प्रकल्प उभारण्यात त्याचा वाटा होता . रवींद्र धनक ,सुभाष पवार , रवींद्र सानप , शिरीष लोळगे , सन्मानार्थी सोमेश बारवकर , संग्राम शेवाळे ,तौसिफ सय्यद ,अर्णव बेंद्रे यांची ही मनोगते झाली . यावेळी प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले . आभार माधव मुंडे यांनी मानले . दरम्यान चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रावर ही यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा .डॉ . श्रीनिवासराव अल्लम व ख्रिश्चन महाविद्यालय चेन्नईच्या प्राचार्या डॉ. लिनन जस्पर यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . अभ्यासकेंद्राचे मार्गदर्शक प्रा . चंद्रकांत धापटे म्हणाले की शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचावी शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा याकरिता यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. चव्हाण हे उत्तम साहित्यीक व शिक्षणतज्ञ होते . राज्याचे कृषि व औद्योगिक धोरण निर्माण करण्यात त्याचे मोठे योगदान आहे. आजच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्याचा प्रगतीचा पाया चव्हाण यांच्या धोरणातुन घातला गेल्या . राजकारणात सुसंस्कृतपणा जपण्याचे काम त्यांनी केले . चव्हाण यांचे जीवनकार्य नवीन पिढी पर्यत पोहचण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत .त्याच्या विचारांचे चिंतन मनन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले . यावेळी प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा डॉ. अंबादस केत यानी केले . त्यात अभ्यासकेंद्रावर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.डॉ . सुनील भोईटे यावेळी उपस्थित होते . स्वागत व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले .आभार केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे यांनी मानले .फोटो ओळी - स्व.यशवंतराव चव्हाण सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठाण शिरूर यांच्या जयंतीनिमित्त गुणवंताचा सन्मान करण्यात आला .