शिरुर - व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर येथे कै .मातोश्री विजया सुवालाल पोखरणा, यांच्या स्मृति प्रीत्यर्थ, पोखरणा एज्युकेशनल ट्रस्ट, शिरूर यांच्या वतीने रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी टॅलेंट हंट शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विकास पोखरणा यांनी दिली . त्यांनी सांगितले की शिरूरमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाढ आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी हा उपक्रम योजण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते आठवी इयत्ते करीता ही परीक्षा होणार असून ही परीक्षा ऑनलाइन, एमसीक्यू( गुण : ५०) पध्द्तीने होणार आहे . इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र,जनरल नॉलेज हे विषय परीक्षेसाठी असणार आहेत .अधिक माहितीसाठी, मो नंबर 9168003666 वर संपर्क साधावा .