शिरुर :  देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतकी धमक असणारा कोणत्याही नेता नाही. .छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने यश मिळवीले.आहे.. केंद्रात ज्याचे सरकार येणार आहे त्या विचाराचा खासदार लोकसभेत गेला पाहिजे असे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मधून महायुतीचा उमेदवारास निवडून घावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी  मांडवगण फराटा , ता.शिरूर येथे केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सोमवार दिनांक ४ मार्च रोजी शिरुर तालुक्याचा दौरावर आले होते . मांडवगण फराटा , ता. शिरुर येथे वाघेश्वर मंदिराजवळ शेतकरी मेळाव्यास व कार्यकर्त्याच्या मेळावास त्यांनी संबोधित केले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते . माजी आमदार पोपटराव गावडे ,माजी आमदार रमेश थोरात , श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे , राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील , माजी सभापती आरती भुजबळ , वैशाली नागवडे , शरद कालेवार , संतोष शितोळे तज्ञिका कर्डिले आदी उपस्थित होते . याच कार्यक्रमात अनेज कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी कॉग्रेस मधे पक्ष प्रवेश केले . पवार म्हणाले की राज्यात सध्या शासनाचा विविध खात्यात ७५ हजार हून आधिक पदांची भरती होत आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही काम करीत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे . अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी १२५० कोटी रुपयेची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी उसाचे दर ही वाढविले असल्याचे ते म्हणाले . लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप झालेले नाही . यासंदर्भात चर्चा सुरू आहे. महायुतीच्या जो उमेदवार असेल त्यास निवडणून आणा असे आवाहन त्यांनी केले. शासन छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य असे देखणे स्मारक उभे करीत आहे. क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम सुरु केले असून मातंग समाजासाठी आर्टी चे कार्यालय सुरु केले आहे. राजमाता सईबाई ,हुतात्मा राजगुरू, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील स्मारक, संत जगनाडे महाराज यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात आले आहे. शिरूर वाघोली रस्त्याचे काम ही करत असल्याचे त्यांनी सांगितले. साडेआठ लाख सौरपंपा द्वारे वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले. शासनाच्या योजना शेवटच्या माणसा पर्यत पोहचवा असे सांगून खासदार अमोल कोल्हे यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुळे तुमची ओळख झाली . त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमातुन अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार मधून उठून गेले. शेवटी लोकशाही आहे ज्याला बसायचे तो बसतो ज्याला निघून जायचे आहे. तो निघून जावू शकतो असे पवार म्हणाले दादा पाटील फराटे म्हणाले की सन १९९१ ला खासदारकीचा प्रचार अजितदादा पवार यांचा केला .दादानी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर काम करण्याची संधी दिली . घोडगंगा कारखाना बंद पडल्याचे शल्य आहे .लोकसभा निवडणूकीला अजितदादा पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यात येईल .अजितदादा निवडून आणू शकतात ते पाडु ही शकतात असे ही फराटे म्हणाले . रवींद्र काळे म्हणाले की अजितदादा पवार यांनी कोट्यावधी रुपयेचा निधी शिरुर तालुक्यास दिला . वढू येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक कार्यक्रमातून विद्यमान खासदार व शिरुरच्या आमदारांनी निघून जायला नको होते .खासदार अमोल कोल्हे यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले की मालिकेत चित्रपटात रिटेक असतो परंतु राजकारणात रिटेक नसतो शिरुरच्या आमदारांनी निष्ठेचा गप्पा मारु नये असे ही काळे म्हणाले . जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी एनडीए बरोबर जाण्याची भूमिका स्पष्ट केली . माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की शिरुरला प्रगतीचा दिशेने नेण्याचे काम आजितदादा पवार यांनी केले घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्नी अजितदादानी मार्ग काढावा असे आवाहन त्यांनी केले . चौकट --्---्--=- अजित पवार म्हणाले की मागील लोकसभा निवडणुकीला डॉ .अमोल कोल्हे यांना मतदान करायला सांगितले होते. त्यांना पक्षात घेतले उमेदवारी दिली . आंबेगावची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांनी घेतली होती तर शिरूर भोसरी हडपसर ची जबाबदारी मी घेतली होती. निवडून ही आणल . कोल्हे यांचे वक्तृत्व चांगले होते दिसायला चांगले होते. चांगले काम करतील करतील असे वाटत होते. पण निवडून आल्या नंतर दोन वर्षा नंतर ते माझ्या कडे आले आणि म्हणाले की दादा मला राजीनाम्या दयायचा आहे. मी म्हटले की जनतेने आपल्यालाला पाच वर्षा करीता निवडून दिले आहे. तुम्हाला काय अडचण आहे का त्यावर ते म्हटले की मी कलावंत आहे. माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्याचे शब्द होते. आता पुन्हा निवडणूकीसाठी दंड थोपाटले आहेत. एखाद्या उमेदवार पराभूत होत नसेल तर आम्ही राजकारणी लोक त्याच्या विरोधात सेलेब्रिटी उभे करतो असे सांगून त्यांनी यासंदर्भातील विविध उदाहरणे दिली. चौकट घोडगंगा सहकारी साखर कारखान्या आम्ही पुन्हा चालू करू शकतो. असे सांगून ते म्हणाले की जे पंचवीस वर्ष इथे होते त्यांनी स्वंत:च्या खाजगी साखर कारखान्या चांगला चालविला पण घोडगंगा साखर कारखाना मात्र मातीत घातला . परंतु आपण चूक सुधारू शकतो. अर्थखाते व सहकारखाते आमच्या कडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेहमीच मदतीची भूमिका असते . अनेक कारखान्यांना मदत ही केलेली आहे. असे ते म्हणाले. कारखान्याचा पदाधिकारी यांना ते म्हणाले की तुम्हाला कारखाना चालवायला जमत आहे की नाही ते सांगा. प्रशासक आणायचे असेल प्रशासक आणू कारखान्याचा चेअरमन बदलायचा असेल तर चेअरमन बदलू असे ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालन सुधीर फराटे यांनी केले तर आभार आरती भुजबळ यांनी मानले .