किलबिल प्राथमिक शाळेची हर घर तिरंग्याची राखी वेधतेय सर्वांचे लक्ष....
बिडकीन ( वार्ताहार ) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हटले जाते.याच दिवशी बहिण भावाच्या पविञ नात्याचा प्रतिक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यंदाचे 11आॕगस्ट 2022 रोजीचे रक्षाबंधन किलबिल प्राथमिक शाळेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्साचे औचित्य साधत अनोखे पध्दतीने साजरे करण्याचा संकल्प करून कृष्णापूर मधिल गावकरी जनतेच्या व सेवाधर्म समाजशील घटक म्हणून सदैव मिञत्वाचे रक्षक म्हणून जे काम करतात असे पोलिस मिञ म्हणून बिडकीन ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट देऊन गावकरी व पोलीस यांच्या मनगटावर 300 हर घर तिरंग्याची राखी शालेय विद्यार्थ्यांनी बाधून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.जसे भाऊ आपल्या बहिनीला तिचे रक्षणासाठी वचन देतो तसे गावकर्याना विद्यार्थ्यांनी घर घर झेंड्याबद्दल राखी बांधून आवाहन केले.रक्षाबंधनाच्या सणाबाबत भावा-बहिणींमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होत असतो त्याचप्रमाणे यावर्षी अनोखी व जगावेगळ्या घर घर तिरंग्याच्चा राखी या संकल्पनेतून आमच्या विद्यार्थ्यांनी देशाच्चा स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करत होते हौशेला मोल नाही या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी रेशमी धाग्यात विणलेली तिरंगी राखी या स्वातंत्र्य अमृत महोत्साचे रक्षासुञ म्हणून सर्वाचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी शाळेचे मुख्यध्यापक सर्व शिक्षकवृंद व शालेय वाहनाचे चालक मालक उपस्थित होते