संजीवनी अँकाडमी नेहमीच भारतीय संस्कृती रूजविण्यासाठी पुढे
वैजापुर: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित वैजापुर येथिल संजीवनी अकॅडमीच्या बालिकांनी वैजापुर येथील पोलीस स्टेशनमध्ये जावुन पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या प्रवित्र सणाच्या निमित्ताने राख्या बांधल्या. जे पोलीस बांधव २४ तास कर्तव्य बजावत सर्वांचे रक्षण करतात, त्यांना वडील भाऊ माणुन बहिण भावांचे पवित्र प्रेम अधोरेखित केले. बालमनावर जे संस्कार बिंबवले जातात, ते माणसाच्या शेवटच्या श्वासांपर्यंत उपयोगी ठरतात. म्हणुन उत्तम संस्कार घडविण्यासाठी संजीवनी अकॅडमी नेहमीच भारतीय संस्कृती बालकांमध्ये रूजविण्यासाठी पुढे असते.
संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. निकिता सुमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन असे कार्यक्रम शाळेत राबविल्या जात असल्यामुळे येणारी पिढी ही सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कृत होणार यांची खात्री पालकांना असल्यामुळे अल्पावधित वैजापुर आणि पंचक्रोशीमध्ये या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन करण्याच्या आणि पोलीस बांधवांच्या प्रती आदर करण्यासाठी संजीवनीच्या बालिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जावुन सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, विजय नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस नाईक भगवान सिंगल, ज्ञानेश्वर शिंदे,रावसाहेब रावते, विजय भोटकर, नवनाथ निकम यांच्यासह इतर पोलीस बांधवांना राख्या बांधल्या.आपल्या पोलीस बांधवांना दीर्घ आयुष्य मिळो व सुख लाभो अशी प्रार्थना केली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.