शिरुर :येथील आर.एम. धारीवाल इंग्लिश मीडियम शाळेत शिवजयंती उत्सहात साजरी करण्यात आली . यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .इयत्ता १ली ते ४थी मधील सर्व विद्यार्थी मराठमोळ्या पोशाखात उपस्थित होते..विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग यावेळी सादर केले .शिवाजीमहाराजांचा जन्मोत्सव ,बालशिवाजी आणि मावळे, शिवाजी महाराजांचे प्रशिक्षण,रायरेश्वर शपथविधी, राज्यभिषेक सोहळा, शिवगर्जना हे सादर केले.शाळेचे चेअरमन अनिल बोरा,शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , तसेच शालेय समितीचे सदस्य धरमचंद फुलफगर , या मान्यवरांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारूम यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमाची महती सांगितली .सहपर्यवेक्षिका अफसाना सय्यद यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पर्यवेक्षिका तृप्ती आगळे यांनी आभार प्रदर्शन केले.