शिरुर -( वार्ताहर ) येथील विद्याधाम प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक व सध्या अहमदनगर येथे वास्तव्य असलेले साहित्यीक व कवि प्रा. केशव भगवान भणगे वय -८२ यांचे निधन झाले .त्याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक मुलगी नातवंडे असा परीवार आहे . भणगे हे सन १९६३ ते सन १९८२ या काळात विद्याधाम प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत होते .सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याना ते गणित विषय शिकवायचे बहिस्थ पध्दतीने त्यांनी बीए व एमए हिंदी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते हिंदी ही विषय शिकवत. प्रशालेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणून ही त्यांनी काम पाहिले . अहमदनगर येथील सरगम प्रेमी संगीत मंडळ याचे ही ते काम पाहत त्याच बरोबर ते उत्तम साहित्यीक व संगीत रसिक व कवि होते . त्यांचे दोन कविता संग्रह व एक कथा संग्रह ही प्रसिध्द आहे .तसेच नाटके व एकांकिकेचे दिग्दर्शन ही त्यांनी केले आहे . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ सेवक सोसायटीचे ते प्रवर्तक होते . प्रसिध्द वैद्यकिय व्यवसायिक डॉ. मंदार भणगे सौ. मंजिरी महाजन यांचे ते वडिल होत .भणगे यांच्या निधनाने बहुआयामी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्ही .डी कुलकर्णी व प्रशालेतील मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक डी. एस .कुलकर्णी यांनी व्यक्त केली .