बीड प्रतिनिधी -

संत सेवालाल जयंती मोठ्या उत्साहात बीड शहरात साजरी सबंध बीड जिल्ह्यातील बंजारा समाज जयंतीच्या निमित्ताने एकवटला .संत सेवालाल महाराजांची जयंती आज असून आज बीड शहरातील जालना रोड या ठिकाणच्या बायपास चौकाला संत सेवालाल चौक असे नाव देण्यात आलेले असून या चौकात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधव उपस्थित होते

बीड शहरातील जालना रोड या ठिकाणी असलेल्या बायपास चौकाला संत सेवालाल महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे आणि या चौकामध्ये मोठ्या उत्साहात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी समाज बांधवांसह विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते सार्वजनिक रित्या साजरी करण्यात आलेल्या या संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला वेगळे स्वरूप प्राप्त झालं होतं यावेळी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले यात संत सेवालाल महाराज हे समाजासाठी किती महत्त्वाचे होते आणि त्यांचे भक्तिमय स्थान हे या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केला आहे.या वेळी प्रदीप राठोड बीड जिल्हा कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष 

अंकुश राठोड सह सचिव महाराष्ट्र बहुजन शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांची विशेष उपस्थिती होती