शिरुर दिनांक ( वार्ताहर ) हलवाई चौक शिरूर येथील हलवाई गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . येथील हलवाई गणेश मित्र मंडळ चौक यांचा वतीने गणेश जयंती निमित्त गणेश यागाचे आयोजन करण्यात आले, त्याच बरोबर होमहवन व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . महाआरती नंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. गणेश जयंरीनिमित्त सकाळ पासूनच भाविकांनी हलवाई गणेशाचा दर्शनासाठी गर्दी केली होती .यापूर्वी मंड्ळाने हजारो भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून पुरणपोळी ,आमरस चपाती , मांसवडी, श्रीखंड पुरी , गोळे रोटी ,रबडी दिलेले आहे. हलवाई गणेशास लोकवर्गणी व भाविकांनी दिलेल्या देणगीतून विविध सोन्या चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. चांदीचे सिंहासन , छत्री , पिंताबर सह विविध अलंकार हलवाई गणेशास करण्यात आलेले आहे . शहरातील मानाचा श्रीगणेश अशी हलवाई गणेशाची ख्याती आहे . विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर गरजू शालेय विद्यार्थ्याना गणवेष वाटप , शालेय साहित्य वाटप व शिक्षीकी व्यवसायात प्रभावी काम करणा-या शिक्षकांना मंडळाचा वतीने प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते . त्याच बरोबर गणेशोत्सव दरम्यान विविध धार्मिक , सामाजिक विषयावर मंडळाने देखावे सादर केले आहेत . पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे . एका वर्षी मंडळाने गणेश विसर्जन साध्या पध्दतीने करुन वाचलेल्या खर्चातून हलवाई चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत . कोरोना काळात ही रस्त्यावरुन प्रवास करणा-या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मंडळाचा वतीने करण्यात आली होती . यंदाचा वर्षी श्री. हलवाई गणेश मिरवणुकीसाठी ट्राली घेण्यात आली असून या ट्रालीचे पूजन ही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . आयोजन करण्यात आले होते . यापूर्वी मंड्ळाने हजारो भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून पुरणपोळी ,आमरस चपाती , मांसवडी, श्रीखंड पुरी , गोळे रोटी ,रबडी दिलेले आहे. हलवाई गणेशास लोकवर्गणी व भाविकांनी दिलेल्या देणगीतून विविध सोन्या चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. चांदीचे सिंहासन , छत्री , पिंताबर सह विविध अलंकार हलवाई गणेशास करण्यात आलेले आहे . शहरातील मानाचा श्रीगणेश अशी हलवाई गणेशाची ख्याती आहे . विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर गरजू शालेय विद्यार्थ्याना गणवेष वाटप , शालेय साहित्य वाटप व शिक्षीकी व्यवसायात प्रभावी काम करणा-या शिक्षकांना मंडळाचा वतीने प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते . त्याच बरोबर गणेशोत्सव दरम्यान विविध धार्मिक , सामाजिक विषयावर मंडळाने देखावे सादर केले आहेत . पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे . एका वर्षी मंडळाने गणेश विसर्जन साध्या पध्दतीने करुन वाचलेल्या खर्चातून हलवाई चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत . कोरोना काळात ही रस्त्यावरुन प्रवास करणा-या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मंडळाचा वतीने करण्यात आली होती . यंदाचा वर्षी श्री. हलवाई गणेश मिरवणुकीसाठी ट्राली घेण्यात आली असून या ट्रालीचे पूजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पुजारी व अध्यक्ष प्रणव मुसळे यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . याखेरीज मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Israel Hamas War: ग़ज़ा के लोगों को भागने के लिए रोज़ 4 घंटे का मिलिट्री पॉज़ देगा इसराइल(BBC Hindi)
Israel Hamas War: ग़ज़ा के लोगों को भागने के लिए रोज़ 4 घंटे का मिलिट्री पॉज़ देगा इसराइल(BBC Hindi)
Breaking News: अफ्रीकी देश Mali में हुआ सड़क हादसा, पुल से नीचे गिरी बस, 31 लोगों की मौत | Aaj Tak
Breaking News: अफ्रीकी देश Mali में हुआ सड़क हादसा, पुल से नीचे गिरी बस, 31 लोगों की मौत | Aaj Tak
मौसमी बीमारियों एवं हीटवेव से संबंधित व्यवस्थाओ की समीक्षा की
सीएमएचओ डॉ ओ पी सामर द्वारा शुक्रवार को स्वास्थ्य भवन मै मौसमी बीमारियों की व्यवस्थाओ तथा हीटवेव...
મહુવા અનાવલ સ્ટેટ હાઇવે પર ઘોળીસ્થળ નજીક અકસ્માત ઇજાગ્રસ્તોને 108 મારફતે હોસ્પિટલમાં ખસેડવામાં આવ્યા
મહુવા અનાવલ સ્ટેટ હાઇવે પર વહેવલ અનાવલ વચ્ચે ઘોળીસ્થળ નજીક અકસ્માત સર્જાયો ઘટનાની જાણવા મળતી વિગત...
आटे में ये चीज़ मिलाएं, आटा ही दवा बन जायेगा | Best Flour For Health | Best Atta
आटे में ये चीज़ मिलाएं, आटा ही दवा बन जायेगा | Best Flour For Health | Best Atta