शिरुर दिनांक ( वार्ताहर ) हलवाई चौक शिरूर येथील हलवाई गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . येथील हलवाई गणेश मित्र मंडळ चौक यांचा वतीने गणेश जयंती निमित्त गणेश यागाचे आयोजन करण्यात आले, त्याच बरोबर होमहवन व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . महाआरती नंतर  आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा  हजारो भाविकांनी  लाभ घेतला. गणेश जयंरीनिमित्त सकाळ पासूनच भाविकांनी हलवाई गणेशाचा दर्शनासाठी गर्दी केली होती .यापूर्वी मंड्ळाने हजारो भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून पुरणपोळी ,आमरस चपाती , मांसवडी, श्रीखंड पुरी , गोळे रोटी ,रबडी दिलेले आहे. हलवाई गणेशास लोकवर्गणी व भाविकांनी दिलेल्या देणगीतून विविध सोन्या चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. चांदीचे सिंहासन , छत्री , पिंताबर सह विविध अलंकार हलवाई गणेशास करण्यात आलेले आहे . शहरातील मानाचा श्रीगणेश अशी हलवाई गणेशाची ख्याती आहे . विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर गरजू शालेय विद्यार्थ्याना गणवेष वाटप , शालेय साहित्य वाटप व शिक्षीकी व्यवसायात प्रभावी काम करणा-या शिक्षकांना मंडळाचा वतीने प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते . त्याच बरोबर गणेशोत्सव दरम्यान विविध धार्मिक , सामाजिक विषयावर मंडळाने देखावे सादर केले आहेत . पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे . एका वर्षी मंडळाने गणेश विसर्जन साध्या पध्दतीने करुन वाचलेल्या खर्चातून हलवाई चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत . कोरोना काळात ही रस्त्यावरुन प्रवास करणा-या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मंडळाचा वतीने करण्यात आली होती . यंदाचा वर्षी श्री. हलवाई गणेश मिरवणुकीसाठी ट्राली घेण्यात आली असून या ट्रालीचे पूजन ही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . आयोजन करण्यात आले होते . यापूर्वी मंड्ळाने हजारो भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून पुरणपोळी ,आमरस चपाती , मांसवडी, श्रीखंड पुरी , गोळे रोटी ,रबडी दिलेले आहे. हलवाई गणेशास लोकवर्गणी व भाविकांनी दिलेल्या देणगीतून विविध सोन्या चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. चांदीचे सिंहासन , छत्री , पिंताबर सह विविध अलंकार हलवाई गणेशास करण्यात आलेले आहे . शहरातील मानाचा श्रीगणेश अशी हलवाई गणेशाची ख्याती आहे . विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबर गरजू शालेय विद्यार्थ्याना गणवेष वाटप , शालेय साहित्य वाटप व शिक्षीकी व्यवसायात प्रभावी काम करणा-या शिक्षकांना मंडळाचा वतीने प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते . त्याच बरोबर गणेशोत्सव दरम्यान विविध धार्मिक , सामाजिक विषयावर मंडळाने देखावे सादर केले आहेत . पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे . एका वर्षी मंडळाने गणेश विसर्जन साध्या पध्दतीने करुन वाचलेल्या खर्चातून हलवाई चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत . कोरोना काळात ही रस्त्यावरुन प्रवास करणा-या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मंडळाचा वतीने करण्यात आली होती . यंदाचा वर्षी श्री. हलवाई गणेश मिरवणुकीसाठी ट्राली घेण्यात आली असून या ट्रालीचे पूजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पुजारी व अध्यक्ष प्रणव मुसळे यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . याखेरीज मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती .