स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हर घर तिरंगा या प्रचार रथाला आमदार कृष्णा गजबे यांनी दाखविली हिरवी झेंडी

महिला व बालकल्याण तसेच पंचायत समिती कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने हर घर तिरंगा या जनजागृती अभियानाचा शुभारंभ

पंचायत समिती, कुरखेडा सेल्फी पॉईंटचेही केले उद्घाटन

कुरखेडा;

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला व बालकल्याण तसेच पंचायत समिती कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने "आजादी का अमृत महोत्सव" हर घर तिरंगा या जनजागृती अभियानाचा शुभारंभ करणाऱ्या प्रचार रथाचे व सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचाराकरिता रवाना केले.

   याप्रसंगी माळी साहेब तहसिलदार, बिडिओ धीरज पाटील, सिडीपीओ गणेश कुकडे, उपविभागीय कृषि अधिकारी गेडाम, सुरभी बाविस्कार तालुका कृषि अधिकारी, चांगदेव फाये, गणपती सोणकुसरे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

    यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी कुरखेडा तालुक्यातील प्रत्येक घरावर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा प्रसंगी तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा यासाठी हे प्रचार रथ कुरखेडा शहरात तालुक्यात फिरणार असून त्या माध्यमातून जनतेला आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याची माहिती दिली.

     तिरंगा ध्वज कुठून मिळेल याचीही माहिती या प्रचार रथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज कसा फडकवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व संपूर्ण तालुका तिरंगामय करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंचायत समितीच्या आवारातील सेल्फी पॉईंट येथे स्वतःची सेल्फी काढून या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले व अधिका अधिक लोकांनी या सेल्फी पॉइंट वर येऊन स्वतःचा फोटो काढून प्रचार प्रसार करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.