शिरुर : श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचा वतीने दिनांक १५ फेबृवारी ते १९ फेबृवारी २०२४ रोजी स्वर्गिय धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन साई गार्डन मंगल कार्यालय शिरुर येथे दररोज सायंकाळी पावणेसात यावेळेत होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक यांनी दिली . व्याख्यानमालेचे यंदा हे २७ वे वर्ष असून महाराष्ट्रातील एक महत्वाची व व्याख्यानमाला असून महाराष्ट्रातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत यांनी व्याख्यानमालेस हजेरी लावली आहे . या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले गुंफणार आहेत ते ' कृत्रिम बुध्दिमत्ता आणि उद्याचे जग ' यावर विषयावर बोलणार आहेत . १६ फेबृवारीस लेखक व पत्रकार चंद्रकांत झटाले हे ' मजबुती का नाम महात्मा गांधी ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत . १७ फेबृवारीस ह. भ . प धर्मकिर्ती महाराज परभणीकर हे 'शिवकाळ आणि आजची परिस्थिती ' या विषयावर बोलणार आहेत . १८ फेबृवारीस राजकिय विश्लेषक व संशोधक डॉ .प्रकाश पवार हे ' छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक सलोख्याची राजनिती ' या विषयावर बोलणार आहेत . १९ फेबृवारीस प्रसिध्द चार्टड अकौटंट व लेखक गिरीष जाखोटिया हे ' छत्रपती शिवाजी महाराज आणि २१ वे शतक ' या विषयावर बोलणार आहेत . त्याच बरोबर दिनांक १९ फेबृवारीस सकाळी साडेदहा वाजता पुणे नगर रस्त्यावरील शिवसेवा मंडळाजवळ शिवरायाचा प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे . व्याख्यानमालेस व अभिवादनाचा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धनक यांनी केले आहे .

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |